डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुलीवर यशस्वी उपचार

मुंबई : दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक झालेल्या अपघातात पुढे उभ्या असलेल्या ३ वर्षांच्या मुलीच्या कवटीला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखत न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली टीमने या तीन वर्षीय अरिबा खुरेशीवर गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत तिला नवे आयुष्य मिळवून दिले.


न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी, प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय, नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. शिवकुमार आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संजीव आहुजा यांच्यासह टिमने या चिमुरडीवर यशस्वी उपचार केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि वेळीच केलेल्या उपचारांमुळे तिचा जीव वाचविता आला आणि आता ती बरी होत आहे.
अचानक झालेल्या अपघाताने दुचाकी वाहनावर(स्कुटीवर) समोर उभ्या असलेल्या या चिमुरडीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, ज्यामुळे तिच्या कवटीचे तुकडे झाले आणि डोक्याच्या हाडाला गंभीररीत्या मार बसला. तिला बेशुद्ध अवस्थेतच पवईतील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आले.


पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांनी या प्रकरणाविषयी आणि या स्थितीतचे वर्ण करताना "तुटलेल्या अंड्याच्या कवचाला एकत्र जोडणे" असे हे प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. रुग्णाला त्वरीत शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, म्हणून डॉ. अन्सारी यांनी प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय यांच्या सहकार्याने तिची कवटी पुन्हा बांधली ती दुरुस्ती केली. तिच्या कवटीत निर्माण झालेले अंतर भरण्यासाठी, त्यांनी मुलीच्या शरीरातील ऊतींचा वापर केला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठ दिवसातच तिच्यात सुधारणा दिसून आली. तिने स्वतःहून डोळे उघडले.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र