सोलापूर-गोवा विमानसेवा ९ जूनपासून, तिकीट विक्री सुरू

सोलापूर : सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला. विमानसेवा देणाऱ्या फ्लॉय ९१ कंपनीकडून तिकीट विक्री सुरू करण्यात आली. ९ जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-सोलापूर या मार्गावर आठड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जाणार असल्याची माहिती फ्लॉय ९१ चे वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी दिली.

फ्लॉय ९१ कंपनीच्या संकेतस्थळावर सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर असे सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवसांचे वेळापत्रक व तिकिटांचे दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सोलापूर ते गोवा मार्गासाठी प्रारंभिक तिकीट दर दोन हजार ४७५ रुपये आणि ५ टक्के जीएसटी असे आहेत. या दरामध्ये मागणीनुसार वाढ होऊ शकते.

सोलापूर येथील विमानसेवेमुळे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी गोवा जोडले जाणार आहे. गोवा येथील भाविकांना सोलापूरला येण्याची तसेच सोलापूरच्या पर्यटकांना गोव्याला जाण्याची सुविधा या विमानसेवेमुळे निर्माण झाली आहे.
Comments
Add Comment

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व