PBKS vs RCB, IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु कोण अंतिम फेरीत पोहोचेल?

मुंबई(सुशील परब): आयपीएल २०२५ लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज क्लॉलिफायरचा पहिला सामना खेळला जाणार असून हा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये होणार आहे. ही एक रोमांचक लढत होणार असून दोन्ही संघ मजबूत आहेत. तसेच पंजाब किंग्ज यांनी या हंगामात सर्वाधिक विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे त्यांची सांघिक कामगिरी ही उत्तम असल्याचे दिसून येते. त्यांचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग शानदार खेळी करत सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.


मुंबई विरुद्ध प्रियांश आर्यने ३५ चेंडूंत ६२ धावांची शानदार खेळी केली, त्याला जोश इंग्लिसची चांगली साथ मिळाली होती त्यामुळे त्यानेही अर्धशतक झळकावले होते. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस अशा चांगल्या फलंदाजांची फळी त्यांच्याकडे असून अर्शदीप सिंग, हरप्रित ब्रार, मार्को जेन्सन, विजयकुमार असे चांगले गोलंदाजही आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सातही बाहेरचे सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याला फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार, मयांक अग्रवाल, जितेश शर्मा, रामारीओ शेफर्ड, कुणाल पंड्या यांची साथ आहे. तसेच जोश हेजलवूड गोलंदाजीत प्रभावी ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, नुवान तुशारा, यश दयाल, रोमारियो शेफर्ड असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.


संघाच्या कामगिरीनुसार पंजाब किंग्ज थोडेसे वरचढ वाटत असून घरच्या मैदानावर खेळण्याचा पंजाबला फायदा होईल. मात्र हरलेली बाजी पलटविण्यात आरसीबी माहीर आहे. त्याचप्रमाणे हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे. यामुळे आरसीबीचा अनुभव आणि विराट कोहलीचा फॉर्म त्यांना विजय मिळवून देऊ शकतो का ते पाहुया. हा सामना चंदिगडला होत असल्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब अंतिम फेरीत पोहोचेल व आरसीबी दुसरा क्लॉलिफाय सामना खेळेल. चला तर पाहुया पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु जिंकतो की पाऊस जिंकतो?

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत