पाकिस्तान आपल्या भूमीवरून संपूर्ण जगात दहशतवाद पसरवतो !

मुंबई : भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो; भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो, अशी परखड टीका करत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. तर गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहे. मात्र आता भारत दहशहतवाद सहन करणार नाही. प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. असा इशारा देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाकिस्तानला दिला.


यूएईच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नुकताच काँगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केला. यावेळी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठका देखील पार पडल्या.काँगो प्रजासत्ताक दौऱ्यात राजकीय नेतृत्वासोबत अनेक उच्चस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ज्याँ-पियरे बेम्बा गोम्बो, उपपंतप्रधान व परिवहन मंत्री, थेरेस कायिकवांबा वाग्नर, परराष्ट्र, आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, व्हायटल कामेरे ल्वा कन्यिगिन्यी एनकिन्गी, लोकसभेचे अध्यक्ष, ज्याँ-मिशेल समा लुकोन्दे क्येन्गे, सिनेट अध्यक्ष यांच्या समवेत पहिल्या दिवशी बैठका पार पडल्या. या बैठकीदरम्यान काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही, हे स्पष्ट केले. त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.


परराष्ट्र राज्यमंत्री थेरेस वाग्नर यांनी भारताने सीमापार दहशतवादासंदर्भातील माहिती दिल्याबद्दल आभार मानले. भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात काँगो प्रजासत्ताक पूर्णपणे पाठिशी आहे, आणि जागतिक व्यासपीठांवर, जिथे काँगो सदस्य आहे, तिथे भारताचा संदेश पोहोचवण्याची तयारी त्यांनी
व्यक्त केली.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.