ठाण्यातून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

ठाणे : मुंबई जवळच्या ठाण्यातून पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. भारतातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप अटक केलेल्या हेरावर आहे. या गुप्तहेराला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेसाठी काम करत होता आणि एका पाकिस्तानी एजंटने त्याला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवले होते. पाकिस्तानी एजंटने फेसबुकवर महिला असल्याचे भासवून आरोपीशी मैत्री केली होती. आरोपीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत व्हॉट्सअॅपद्वारे एका 'पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणे'ला एका महत्त्वाच्या आस्थापनेबद्दलची संवेदनशील माहिती शेअर केली होती.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीआधारे एटीएसच्या ठाणे शाखेने आरोपीला इतर दोघांसह ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीनंतर, त्या व्यक्तीला अधिकृत गुपित कायद्याच्या कलम ३ (जे हेरगिरीशी संबंधित आहे) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या इतर दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Crime : इन्स्टावर ओळख, चॅटिंग अन् प्रेम; तीन मुलींच्या आईसोबत छत्रपती संभाजीनगरात घडला भयंकर प्रकार

Chhatrapati Sambhajinagar : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लोकांशी जोडण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. मात्र, याच सोशल

Ahilyanagar Crime : ​खाकीचे स्वप्न अपूर्णच राहिले ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीनं आयुष्य संपवलं

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील

Maharashtra Government : महाराष्ट्रात मोठे निर्णय! जमीन, शेती, शिक्षणासाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई: भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणाऱ्या व्याज दरांत सुधारणा. भूमिसंपादन, पुनर्वसन व

Yeola Paithani : येवला पैठणीचा राष्ट्रीय सन्मान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते येवला पैठणीचे टपाल तिकीट प्रकाशित

Yeola Paithani postage stamp : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या नासिक जिल्ह्यातील

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च