निळवंडेच्या पाण्यावर टीका करणाऱ्यांना पाणी आणून उत्तर दिले : डॉ. सुजय विखे-पाटील

  37

निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाचे जलपूजन


राहाता : निळवंडेचे पाणी येणार नाही अशी टीका करणा-यांना प्रत्यक्ष पाणी पाझर तलावामध्ये आणून उत्तर दिले आहे.जोपर्यंत निळवंडे चे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला आहे.या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही येथील जनतेने विकासला आणि पाणी देणा-या नेतृत्वाला अर्थात मंत्री विखे पाटील यांना आठव्यांदा मतदान करून दिले आहे.पाणी आल्याने जिरायत भाग समृध्द झाला आहे.ज्यांनी विखेना विरोध केला,त्यांना त्यांची चुक समजली आहे.त्यामुळे तेही आपल्या सोबत येत आहे.आपण जे ठरवतो तेच करतो,आता शेजा-यांच्या प्रेमात पडू नका असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.


राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे, डोऱ्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाच्या जलपूजन प्रसंगी डॉ.विखे पाटील बोलत होते.यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की,निळवंडे कालव्यांची केवळ मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणीस आणि स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे.कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झाले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५० फुट चढ असतांना पाणी या गावांना मिळाले.निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. ४० वर्ष संघर्ष केला त्याला आता यश आले आहे. या पाण्याचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा.पाण्यावरून कायमच टीका होत गेली, पाणी आल्याने ह्या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे.मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण करणारे नेते आहेत.आम्ही आपल्या सोबत आहोत असे वातावरण या भागात होत आहे.


शिर्डी मतदार संघ कायमच विखे पाटलांबरोबर राहिलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना भविष्यामध्ये २५ वर्षाचा विचार करून शिर्डी मतदार संघाची बांधणी करणार असल्याचे सांगून शिर्डी एमआयडीसी मध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून १६७ कोटीचा प्रकल्प, शासकिय आय.टी.आय, बायपासचे चौपदरीकरण, रोजगार निर्मिती, ऊस शेतीच्या माध्यमातून या भागाला समृद्धी देता येणार आहे.जनतेच्या विकासासाठी विखे परिवार कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही देत,शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदर्श शिर्डी करीता गुन्हेगारी मुक्त शिर्डी हा आपला संकल्प आहे तो पूर्णच करणार आहोत.


निळवंडे पाणी प्रश्न सोडावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेलो आज जलसंपदा खाते हे काय करू शकते हे मंत्री विखे पाटील प्रत्यक्ष कामातून विरोधकांना उत्तर दिले आहे. या परिसरातील विखे पाटलांच्या अनेक विरोधकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करत आम्ही आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही या निमित्ताने दिली. गावोगावी नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे उस्फुर्त स्वागत केले.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत