चुकीची वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई

  22

बँकेच्या वाहनाचा समावेश


राहुरी : चुकीच्या बाजूने वाहने चालवून वाहतूक जाम करत असलेल्या वाहन चालकावर कारवाई करत शिस्त लावण्याच्या मोहिमेचा धडाका सध्या राहुरीचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी लावला असून आजच्या कारवाईत अन्य वाहनासह एका बॅंकेच्या रोकड वाहून नेत असलेल्या वाहनाचा समावेश आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी २९ मे रोजी सोडेबाराच्या सुमारास शनिशिंगणापूर फाटा ते राहुरी खुर्द दरम्यान वाहतूक जाम झाल्याने एकूण दहा वाहनांनी चुकीच्या बाजूने धोकादायक पद्धतीने गाड्या घातल्या ज्यामुळे अधिकच वाहतूक जाम झाल्याने सुमारे सात वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सात हजार रुपये दंड वसूल केला.

त्यामध्ये युनियन बँकेचे कॅश वाहन क्रमांक एम. एच १२युएम ५८५५ या वाहनावर कारवाई करत दिड हजार रुपये दंड आकारण्यात आला.ट्रक क्रमांक एम एच १७ सीव्ही ८३८६ वरिल चालक सचिन केशव जोशी राहणार बेलापूर, ट्रक क्रमांक आरजे १४ जीके ३०५२ चालक नजीम आशु खान राहणार जिजारा जिल्हा आलवर, राजस्थान, ट्रक क्रमांक केए ४२बी ५५७७ चालक परशुराम कृष्णा पवार राहणार सुसुर जिल्हा सादगीर कर्नाटक अशा तीन ट्रक चालकांवर एमव्हीए १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईच्या अनुषंगाने सदर चालकांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुरी यांचे न्यायालयात पाठविण्याची तजवीज ठेवलेली आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, फुलमाळी, चालक शकूर सय्यद, सचिन ताजणे यांच्या पथकाने केली.

दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नगर -मनमाड महामार्गावर कोणीही चुकीच्या बाजूने वाहने चालवून वाहतूक जाम करू नये. तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी, राहुरी शहरासह महामार्गावर केली जाणार आहे.
Comments
Add Comment

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या