
पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, काही दिवस भाजीपाल्याचा उच्चांक कायम
नवी मुंबई: राज्यात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामधील भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
परिणामी, एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली (Rain Hits Vegetables Supply) आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पावसाआधी ६०० ते ७०० गाड्या मार्केटमध्ये होत्या. पण पावसानंतर बाजारात आता फक्त ४०० ते ४५० गाड्यांचीच आवक होत आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही (Vegetables price hike) झाला आहे.
पुढील काही दिवस भाज्या महागच
सध्या बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहे. ग्राहकांना याचा फटका भाजीपाला दरवाढीच्या स्वरूपात बसला आहे. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात शेवगा 160 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर 100 ते 130 रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.
किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)
- शेवगा 150-160 रुपये
- शिमला मिरची 100-110 रुपये
- फ्लॉवर 120-130 रुपये
- गवार 120-130 रुपये
- टोमॅटो 50-60 रुपये
- वांगी 60-70 रुपये
- गाजर 60-70 रुपये
- काकडी 60-70 रुपये
- भेंडी 80-90 रुपये
- कार्ली 80-90 रुपये
पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी):
- कोथिंबीर 50 रुपये
- मेथी 50 रुपये
- पालक 50 रुपये