तपास एसआयटीकडे द्यावा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी

पुणे : वैष्णवीला ज्या दिवशी बेदम मारहाण करण्यात आली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सांगतो. याचा अर्थ संगनमताने कट रचून वैष्णवीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी केली आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशीही तिला बेदम मारहाण झाली होती. वैष्णवीच्या मृतदेहावार एकूण २९ जखमा आढळल्या. यातील १५ जखमा या मृत्यूआधीच्या २४ तासांतील असल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद आहे. बावधन पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी केली आहे.

शरीरारावरील जखमांबाबत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद माहितीनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या त्या दिवशी तिला बेदम मारहाण झाली होती. तसेच याआधीही वारंवार मारहाण होतच होती. कधी पाईप तर कधी गज वापरुन मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. छळ करुन वैष्णवीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) तपास करुन घेतला तर दोषींना शिक्षा होईल, अशी आशा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व