एमपी लीगने हंगामासाठी १० संघांच्या जर्सीचे केले अनावरण

नवी दिल्ली : मध्य प्रदेश लीगने नुकतीच एका समारंभात त्यांच्या आगामी हंगामासाठी सर्व १० फ्रँचायझी संघांच्या जर्सीचे अनावरण केले. हा हंगाम १२ जूनपासून ग्वाल्हेरमधील शंकरपूर येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे.


या समारंभात राज्यभरातील सर्व खेळाडू, संघ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या तत्त्वाखाली ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित या स्पर्धेत पुरुष संघांची संख्या पाच वरून सात करण्यात आली आहे. यावेळी बुंदेलखंड आणि चंबळ भागातील संघ देखील स्पर्धेत सहभागी होतील. या हंगामात प्रथमच महिला क्रिकेट लीगची सुरुवात होणार आहे, जी पुरुषांच्या सामन्यांसोबत आयोजित केली जाईल. महिलांच्या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील. यामध्ये भोपाळचा संघ देखील समाविष्ट आहे.


जर्सी अनावरण सोहळ्यात बोलताना अध्यक्ष महानार्यमन सिंधिया म्हणाले की, जर्सी अनावरण सोहळ्याचे यश हे एका रोमांचक हंगामाच्या सुरुवातीचे संकेत देते. पहिल्या हंगामातील प्रचंड यश आणि या हंगामातील उत्साह पाहता, मध्य प्रदेश लीग क्रिकेट प्रतिभेचा आणि प्रादेशिक अभिमानाचा उत्सव बनली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यावेळी आम्ही केवळ लीगचा विस्तार करत नाही आहोत तर महिलांची स्पर्धा देखील सुरू करत आहोत, जी आमची विचारसरणी आणि खेळाप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत