अवकाळी पावसामुळे महिला गृहोद्योगांची गणिते कोलमडली

उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेत कमतरता


पोलादपूर (शैलेश पालकर) : यंदा ९ मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाअभावी वाळवणीच्या पदार्थांची बाजारपेठेमध्ये कमतरता निर्माण झाली असून महिला गृहोद्योगांची गणितेदेखील अवकाळी पावसामुळे यंदा चुकल्यामुळे लाडक्या बहिणींच्या या महिला गृहोद्योगांना राज्यसरकारने साथ देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांची निर्मिती मोठ्या संख्येने झाली असून अनेक महिला बचतगटांमार्फत सुरू असलेल्या महिला गृहोद्योगांना सूक्ष्म कर्ज, लघू कर्ज आणि मध्यम कर्जांचे वाटपदेखील करण्यात आले आहे. यापैकी अनेक महिला बचतगटांना ही कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तथाकथित समाजसेवकाने बचतगटातील आठपैकी सात महिलांची कर्ज हडपून एका महिलेच्या सूक्ष्म कर्जात बचतगटाचे रोजगार निर्मिती व सक्षमीकरणाचे काम सुरू ठेवण्याचे भोंगळ मार्गदर्शन करताना पहिल्या कच्च्या मालाचा वापर होऊन तो संपण्यापूर्वीच पुढच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याची हमी देत हा समाजसेवक गाशा गुंडाळून पसार झाला आहे. यातच अवकाळी पाऊस झाल्याने वाळवणीच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे आडाखे बांधणाऱ्या महिला गृहोद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.



अवकाळी पावसामुळे गृहोद्योग नुकसानीत


महाड तालुक्यातील नाते येथील देवळेकरबंधू गृहोद्योगाच्या संचालिका अस्मिता देवळेकर यांनी, लाडक्या बहिणींनी त्यांच्या सानुग्रह अनुदानाद्वारे घरच्याघरी उद्योगनिर्मिती केली आणि पावसाने या लाडक्या बहिणींवर वक्रदृष्टी केल्यामुळे हे गृहोद्योग अवकाळी पावसामुळेच यंदा नुकसानीत गेले असल्याचे सांगितले असून बँकांची सूक्ष्म कर्ज फेडून बँका वाचविता येतील मात्र, संसार वाचविण्यासाठी महिलांचे गृहोद्योग वाचविले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा करून महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत महिला गृहोद्योगांना आर्थिक अनुदान देऊन यंदा अवकाळीच्या संकटातून तारण्याची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.

Comments
Add Comment

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त

Cyber Crime : रायगड पोलिसांची सायबर टोळीवर मोठी कारवाई; ३५ कोटींच्या गैरव्यवहाराचा भंडाफोड

रायगड  : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची

Matheran Heritage Mini-Train : माथेरानच्या हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

माथेरान : ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण