Tribal woman gives birth on the road: रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने, रस्त्यातच जन्मले बाळ, दगडाने तोडली नाळ!

जळगाव: जळगावच्या चोपड्यात बोरमडी गावात रस्त्यावर एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. एका आदिवासी महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर, वेळेत रुग्णवाहिका न आल्यामुळे दुचाकीवरून रुग्णालयात न्यावं लागलं. मात्र, रस्त्यातचं या महिलेची प्रसूती झाली. दरम्यान प्रसुती करण्याचे साहित्य नसल्याने उपस्थित महिलांनी दगडाच्या सहाय्यानेच नाळ तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी महिलेच्या अशा पद्धतीच्या प्रसूती बद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे.

फोन करून देखील रुग्णवाहिका आली नाही 


मिळालेल्या माहितीनुसार, बोरमडी येथील आदिवासी महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या.  यासाठी तिच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. शेवटी प्रसूती कळा वाढल्याने तिच्या पतीने तिला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना ती रस्त्यातच प्रसूती झाली, यादरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म तर दिला, पण यावेळी या ठिकाणच्या इतर महिलांनी प्रसूती करताना साहित्य नसल्याने चक्क दगडाच्या सहाय्याने नाळ तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांचा संताप


प्रतिभा या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स आशा वर्कर , पारिचारिका या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे. तब्बल अर्धातास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदार संघ आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असताना महिलेला अशा पद्धतीने प्रसूती होण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा वाईट ते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी महिलांच्या अशा पद्धतीच्या प्रसूती बद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे.या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स आशा वर्कर , पारिचारिका या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.

 
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र