Pune Rain: आळंदीत इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, भक्ती सोपान पूल पाण्याखाली

पुणे: वारकरी संप्रदायांच्या महत्वाच्या स्थानांपैकी एक असलेल्या देवाची आळंदी देवस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषदेने दिल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती देताना नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच मावळ भागातही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी आणि परिसरातही संतत धार सुरू आहे. याचा परिणाम इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून, पुराचे पाणी भक्ती सोपान पुलावरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी काठच्या पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे.



नागरिकांना सतर्कतेचा इशारा


आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी इंद्रायणी काठी पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीकाठच्या दगडी घाटावर पाणी वाहत असल्याने कोणत्याही नागरिकांनी पाण्यात उतरू नये. तसेच स्थानिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पुरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी, आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आणि वेळोवेळी परिस्थितीची सूचना देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ध्वनिक्षेपण देखील लावण्यात आले आहेत.



पुण्यात पावसाचा रेड अलर्ट 


पुण्यात मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आलं आहे.





Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी