वणी ग्रामस्थांचा महावितरणबाबत तक्रारींचा पाढा, अधिका-यांना धरले धारेवर

वणी:  गेल्या दोन महिन्यांपासून विजेच्या पुरवठ्याबाबत नियमित तक्रारी व त्यामुुुळे सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठाही होत नसल्याने ग्रामपालिकाही त्रस्त झालेली. अशा परिस्थितीत सरपंच मधुकर भरसट यांनी महावितरण कंपनीचे दिंडोरी उप कार्यकारी अभियंता एस. के. राऊत यांना बोलवत ग्रामस्थांसह समस्यांचा पाढा वाचून महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले.


यावेळी उपसरपंच विलास कड यांनी वीज बिल भरण्याची अंतिम मुदत बाकी असतानाही वीज बिल भरले नाही म्हणून वणीला पाणीपुरवठा करणारी लाईन का तोडली याबाबत जाब विचारला. ट्रान्सफार्मर पाऊस आला की लगेच ब्रेकडाऊन होतो. तसेच अंबानेर, पांडाणे, फोपशी, नांदुरी, चंडीकापुर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असुन सदर परिसरातील फिडरची लाईट रात्रीच्या वेळी बंद करु नये अशी मागणी काहींनी केली. सरकारी दवाखान्यातील ट्रान्सफाॅर्मरवरून दवाखान्यात होणारा पुरवठाही सुरळीत नाही. गावातील वीज पुरवठा करणारे खांब व त्यावरील लाईन ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहे.


तसेच काही ठिकाणी खांबही जीर्ण झालेले आहेत. तर काही ठिकाणी झुकलेले आहेत. खांबावरील वायरी काही ठिकाणी लोंबकळत असुन त्यांना ताण देऊन त्या ओढून घ्याव्यात अशा अनेक समस्यावजा सूचना करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य यांच्या मार्फत काही सूचना करण्यात आल्या. यावेळी राऊत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत त्यांना तंबी दिली. तसेच पुढील आठ, दहा दिवसांत प्रलंबित कामे जातीने लक्ष घालून पूर्ण करून देतो असे उपस्थित ग्रामस्थांना आश्वासित केले. दिलेल्या मुदतीत प्रलंबित कामे पूर्ण करून वीज पुरवठा नियमित न केल्यास ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडले जाईल, अशी तंबी व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेद्र बोरा यांनी दिली. यावेळी सहा. अभियंता महेश पवार, महेंद्र मुळकर, पी. बी. शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पारख, विजय बर्डे, जगन वाघ, मीनाताई पठाण, कैलास धुम, अनिल गांगुर्डे, नामदेव पैठणे, संतोष रेहेरे, किशोर बोरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Add Comment

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर