Mahira Khan: लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानशी गैरवर्तन, सुरक्षा रक्षकाने असे काही केले की... व्हिडिओ झाला व्हायरल

  129

नवी दिल्ली: पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan)चे जगभरात चाहते आहेत. माहिराने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे, मात्र सध्या पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात तसेच बॉलीवूडमध्ये प्रवेश बंदी असल्याकारणांमुळे, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार इतर देशांत फिरताना दिसून येत आहे. तिचा आगामी चित्रपट 'लव्ह गुरू'चे जोरदार प्रमोशन ती करत आहे. या दरम्यान लंडन येथील प्रमोशनल इव्हेंटमधील माहिराचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती लोकांच्या प्रचंड गर्दीत अडकलेली दिसून येते. या व्हिडिओंमध्ये माहिरा गर्दीतून बाहेर पडण्याचा संघर्ष करताना दिसून येते. तसेच गर्दीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षारक्षकांनी तिला ज्याप्रकारे घट्ट पकडले आहे, त्यामुळे देखील ती प्रचंड अस्वस्थ झालेली दिसून येते. या कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे बोलले जात आहे.



लंडनमध्ये प्रमोशन दरम्यान माहिरासोबत गैरवर्तन


भारतात इतर पाकिस्तानी कलाकारांप्रमाणे माहिरा खानचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले आहे. तसेच ती तिच्या चित्रपटाचे प्रमोशन देखील भारतात करू शकत नाही. त्यामुळे माहिराने लंडन गाठले. यादरम्यान चित्रपटातील तिचा सहकलाकार हुमायून सईद देखील तिच्यासोबत होता. माहिराच्या चित्रपटासाठी, लंडनमधील इल्फोर्ड येथील इंडो-पाक सुपरमार्केटमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे तिला पाहण्यासाठी तिचे हजारो चाहते जमले होते, माहिराला पाहून गर्दीचा ताबा सुटला आणि तिथे उपस्थित असलेल्या रक्षकांना गर्दीला नियंत्रित करणे कठीण जात होते. जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, गर्दी इतकी जास्त होती की त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही कोलमडून पडली.



व्हिडिओमध्ये प्रचंड अस्वस्थ दिसून आली माहिरा खान




व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की माहिरा गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, चाहते माहिराची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असताना, गर्दीपासून तिचे रक्षण करण्यासाठी एक सुरक्षा रक्षक तिला घट्ट धरून आहे, ज्यामुळे ती खूपच अस्वस्थ झालेली दिसत आहे. माहिराच्या चेहऱ्यावर त्रास आणि राग स्पष्ट दिसतो. अभिनेता हुमायून देखील या व्हिडिओत दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्दीतील काही लोकांनी माहिराशी गैरवर्तन देखील केले आहे.



भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी


माहिरा खान २०१७ मध्ये शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र, आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. यानंतर, जेव्हा माहिराने ऑपरेशन सिंदूरचा निषेध केला तेव्हा तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन