IPL 2025 : IPLच्या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर'मधील हिरोंचा होणार गौरव!

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2025) साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशातच आयपीएलचा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूर'च्या हिरोंचा सन्मान केला जाणार आहे.


आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ हा ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या यशस्वी कारवाईचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा असणार आहे.



बीसीसीआयचे (BCCI)  सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणाही देते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल २०२५चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.

Comments
Add Comment

गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली

पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की