Haryana News : भयंकर घटना! एकाच कुटुंबातील ७ जणांनी केलं विषप्राशन

हरियानातील पंचकूलामध्ये राहणाऱ्या कुटुंबाने उचलले टोकाचे पाऊल


हरियाणामधील पंचकुलाच्या सेक्टर-२७ मध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. डेहराडूनमधील एका कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये सर्वांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं.


पंचकूलामध्ये राहणाऱ्या या कुटुंबामध्ये एक जोडपं, त्यांची तीन मुलं आणि कुटुंबातील वृद्धांचा समावेश आहे. ज्या कारमध्ये हे सर्व मृतदेह मिळाले, त्या कारचा नंबर डेहराडूनचा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबावर खूप मोठं कर्ज होतं, म्हणूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.


मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतताना त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४२), प्रवीण यांचे पालक, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एका मुलगा यांचा समावेश आहे.



घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. सध्या हे सातही मृतदेह पंचकुला येथील खासगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी अमित दहिया घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.



कुटुंबावर मोठं कर्ज


पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमान कथेला उपस्थित राहण्यासाठी हे कुटुंब डेहराडून येथून आलं होतं. कुटुंबावर खूप कर्ज होतं. कदाचित म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आलं असावं. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि पुढील कारवाई सुरू आहे.



अख्ख्या कुटुंबानेच आत्महत्या का केली?


तपासात पोलिसांना समजलं की, प्रवीणने अलीकडेच डेहराडून येथे टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरु केला होता. त्याने व्यवसायामध्ये बराच पैसा टाकला होता. पण यश मिळालं नाही. व्यवसाय पूर्णपणे लॉसमध्ये गेल्याने प्रवीण कर्जात बुडाला होता. कुटुंबाचा खर्च भागवणही दिवसेंदिवस त्याच्यासाठी कठीण झालं होतं. म्हणून संपूर्ण कुटुंबाने जीवन संपवलं.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी