Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

वणी:  दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत अज्ञात सहा लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


२५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहणाऱ्या नांदगाव तालुक्यातील मेंढपाळांवर अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली. यात दुर्योधन समाधान वाघमोडे (वय ३०), श्रावण समाधान वाघमोडे (वय ३४), बाळा समाधान वाघमोडे (वय १९), ताराबाई शांताराम शिंदे (वय २८, सर्व रा. दहेगांव ता. नांदगाव) यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले. यात चौघे जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. रात्री तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींवर डाॅ.नेहा सिंघल व आरोग्य कर्मचारी दिनेश कडवे, काशीनाथ गावित, कन्हैया शर्मा व परिचारिका शैला गावित, सविता ससाणे यांनी तातडीने उपचार केले.


या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. यात एक विधीसंघर्षित आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. समाधान संजय कोकाटे (वय २५), आदेश मोहन वटाणे (वय १९) व रमेश धनराज वटाणे (वय २५, सर्व रा. टिटवे ता. दिंडोरी) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता २८मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,