Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

वणी:  दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत अज्ञात सहा लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


२५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहणाऱ्या नांदगाव तालुक्यातील मेंढपाळांवर अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली. यात दुर्योधन समाधान वाघमोडे (वय ३०), श्रावण समाधान वाघमोडे (वय ३४), बाळा समाधान वाघमोडे (वय १९), ताराबाई शांताराम शिंदे (वय २८, सर्व रा. दहेगांव ता. नांदगाव) यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले. यात चौघे जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. रात्री तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींवर डाॅ.नेहा सिंघल व आरोग्य कर्मचारी दिनेश कडवे, काशीनाथ गावित, कन्हैया शर्मा व परिचारिका शैला गावित, सविता ससाणे यांनी तातडीने उपचार केले.


या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. यात एक विधीसंघर्षित आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. समाधान संजय कोकाटे (वय २५), आदेश मोहन वटाणे (वय १९) व रमेश धनराज वटाणे (वय २५, सर्व रा. टिटवे ता. दिंडोरी) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता २८मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी