Prince Narula : लग्नाच्या सात वर्षांनी प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा केले लग्न, नोंदणी पद्धतीने केला विवाह

मुंबई : सोशिअल मीडिया व टेलिव्हिजन विश्वात सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी. प्रिन्स व नरुला यांनी गेल्यावर्षी चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी १९ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. अशातच आता या जोडप्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोघांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.


युविका आणि प्रिन्स यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या सात वर्षांनी लेकीच्या जन्मानंतर या दोघांनी पुन्हा एकदा विवाह केला आहे. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे आणि या लग्नाबद्दल युविकाने यूट्यूबवर एक व्लॉग व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘माझे दुसरे लग्न’ असं शीर्षक असलेला व्लॉग व्हिडीओ तिने शेअर केला आहे, ज्यात तिने साधा अनारकली ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.



लेकीच्या जन्मानंतर प्रिन्स आणि नरुला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या नात्यात काही कारणांनी आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. शिवाय युविकाने गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त पोस्टही शेअर केली नव्हती. पण कालांतराने युविकाने एका मुलाखतीत असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टता दिली होती.

Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र