क्रेडाईमुळे नाशिकचे उत्तम ब्रँडिंग, स्थापना दिवस सोहळ्यात माजी अध्यक्षांची भावना

नाशिक: बांधकाम व्यावसायिकांची एक संस्था ते नाशिक ब्रॅन्डींग, रोजगार निर्मिती व सामाजिक भान असणारी संस्था असा प्रवास बघताना अत्यानंद होत असल्याचा सूर क्रेडाई (CREDAI) नाशिक मेट्रोच्या सर्व माजी अध्यक्षांनी काढला. निमित्त होते क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ३८ व्या स्थापना दिवसाच्या सोहळ्याचे.


देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोचा ३८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले,  सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेचा आवाका विविध कार्यांनी आज खूप मोठा झाला आहे. नाशिक हे आज देशपातळीवर काम करणाऱ्या क्रेडाईचे उगमस्थान असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.


गेल्या ३८ वर्षात क्रेडाईने गृहनिर्माणासोबतच शहराचे ब्रॅन्डींग, शहर विकास आराखड्यात योगदान, रेरा व युनिफाईड डीसीपीआरची अंमलबजावणी, सदस्यांसाठी नियमित प्रशिक्षण, विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.


कार्यक्रमामध्ये माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, जितेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुरेश पाटील, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे, सुनील भायबंग, किरण चव्हाण, जयेश ठक्कर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवी महाजन व कृणाल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच माजी अध्यक्ष कै. सदुभाऊ शुक्ल यांचे स्मरणदेखील करण्यात आले.
मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले, आजमितीला क्रेडाई नाशिक मेट्रोची सदस्यसंख्या ५०० हून अधिक असून युवा विंग, महिला विंग देखील कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष उदय घुगे यांच्या भाषणाने झाली. तर आभार हंसराज देशमुख यांनी मानले.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी