ब्रिटनच्या लिव्हरपूलमध्ये अपघात, फुटबॉल विजयी परेडमध्ये घुसली कार, अनेकांना चिरडले

लंडन: ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरामध्ये सोमवारी भीषण दुर्घटना घडली. येथे प्रीमियर लीगच्या ट्रॉफी विजयाचे सेलीब्रेशन सुरू होते. यावेळी अनियंत्रित झालेल्या कारने या सेलिब्रेशनमध्ये सहभागी असलेल्यांना चिरडले. ही कार या गर्दीत घुसली आणि तिने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत कमीत कमी २७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती ५३ वर्षीय ब्रिटीश नागरिक आहे. ही व्यक्ती लिव्हरपूलचीच रहिवासी आहे. दरम्यान, पोलीस प्रवक्त्यांनी आवाहन केले आहे की या घटनेच्या परिस्थितीबद्दल कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. तसेच आम्ही ५३ वर्षीय ब्रिटीश व्यक्तीला या प्रकरणात अटक केली आहे.


पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागचे कारण तपासण्यासाठी विस्तृतपणे तपास केला जात आहे. या कारच्या दुर्घटनेत पायी चालत असलेले अनेक जण जखमी झाले होते. जेव्हा या ठिकाणी विजयी यात्रा काढली जात होती त्यावेळेस पायी चालत असलेल्या अनेकांना या कारने उडवले.


 


सोशल मीडियावर एक अनधिकृत व्हिडिओ समोर आला आहे. यात दाखवले आहे की एक कार वेगाने सेलीब्रेशन करत असलेल्या गर्दीच्या दिशेने जात आहे आणि अनेक जण या कारखाली येतात. रिपोर्ट्सनुसार या परेडमध्ये हजारोंच्या संख्येने लोक सामील होते. पोलीस या आधीच कोणत्याही अपघातातबाबत अलर्ट होती. सोबतच चाहत्यांना यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ड्रोनपासून दूर राहण्यास सांगितले होते.


Comments
Add Comment

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग