शाळांवरील गोळीबाराच्या घटनांनी कॅनडा, थायलंड हादरले

ब्रिटिश कोलंबिया : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात सकाळी गोळीबाराची घटना घडली. ईशान्य भागातील टम्बलर रिज येथील टम्बलर रिज शाळेत झालेल्या या हल्ल्यात गोळीबार करणाऱ्यासह किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून, त्यातील दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेतील घटनेनंतर जवळच्या एका घरात आणखी दोन मृतदेह सापडले. या घराचा संबंध या प्रकरणाशी असण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होताच संपूर्ण शाळेत शोधमोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान अनेक पीडित आढळून आले. संशयित गोळीबार करणारा व्यक्तीही मृत अवस्थेत सापडला असून, त्याने स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


आरसीएमपीचे वरिष्ठ अधिकारी केन फ्लॉइड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संशयिताची ओळख पटली असली तरी सध्या नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ‘हा हल्ला का झाला, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजून तपास करत आहोत,’ असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर शाळेसह परिसरातील प्राथमिक शाळेतही तातडीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले. काही जणांना रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुमारे दोन हजार ४०० लोकसंख्या असलेले टंबलर रिज हे शहर व्हँकुव्हर पासून सुमारे हजार किलोमीटर दूर आहे. येथील माध्यमिक शाळेत इयत्ता सातवी ते १२वी पर्यंत जवळपास १७५ विद्यार्थी शिकतात.


थायलंडमध्ये अंदाधुंद गोळीबारात २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या


थायलंडमध्ये २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये घुसून ३४ जणांचा बळी घेतला. याशिवाय दक्षिण थायलंडमधील 'हाट याई' येथील एका शाळेत १८ वर्षांच्या तरुणाने गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्याने एका महिला कर्मचाऱ्याला ओलीस ठेवलं आहे.


थायलंडच्या इतिहासातील ही सर्वात भयानक घटना मानली जात आहे. एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात किमान २२ मुलं आणि १२ लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही देशाच्या इतिहासातील सर्वात घातक 'मास शूटिंग' घटना आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्ल्यामागचा नेमका उद्देश शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.

US-Iran : अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही; इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची

तेहरान : इराण सध्या अमेरिकेशी थेट वाटाघाटी करत नसून, दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांच्या माध्यमातून संदेशांची