वैष्णवी आत्महत्या प्रकरण : सासू, नणंद आणि पतीला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.


पोलिसांकडून हगवणे कुटुंबीयांच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वैष्णवीच्या नावावरचं सोनं तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही.या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे.तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.त्यानुसार त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिसांच्या तपासात, वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे.तसेच या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. त्याच्या हगवणे कुटुंबीयांशी असलेल्या संभाव्य संबंधामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.


पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर तब्बल २९ मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा