जामखेड-सौताडा रस्ता पूर्ण करण्यासाठी २९ पर्यंत अल्टिमेटम

  21

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


जामखेड : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे शहरातील खर्डा चौक ते बीड रोड रस्त्याचे काम रखडले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिक घसरून पडत आहे या रखडलेल्या रस्त्याचे काम येत्या दि २९ पर्यंत करण्यात यावेत अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अतोनात हाल सहन कराव्या लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. तसेच जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे व हलगर्जीपणा मुळे नागरीकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ अदांज पत्रकानुसार रस्त्याचे काम दि. २९/०५/२०२५ गुरुवार पर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असल्याचे पांडुरंग भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या