Corona Update: मोठी बातमी! देशात कोरोना रुग्णांची संख्या १००० च्या पुढे, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात कोरोना साथीच्या रोगाचे नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ सक्रिय रुग्ण असून देशात कोरोना रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ४३० रुग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र २०९ आणि दिल्ली १०४  एक्टिव्ह रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. गुजरातमध्ये ७६ नवीन रुग्ण आढळले आहेत, आता राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ८३ झाली आहे. हरियाणामध्ये कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह प्रकरणांची संख्या ९ झाली आहे. तर राजस्थानमध्ये ११ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, एक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ११ नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशात १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.


मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिलने (आयएमए) कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे. "कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव २०२० किंवा २०२१ सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं" असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी सांगितले

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व