SRH Beat KKR IPL 2025: हैदराबादने बदला घेतला! गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याला लोळवले

मुंबई: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना  (SRH vs KKR) हा खऱ्या अर्थाने रंजक ठरला. आयपीएलच्या गेल्या हंगामातील विजेते आणि उपविजेते असे हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. पण हंगामातील शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने आपली पूर्ण ताकद दाखवत, गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याचा ११० धावांनी धुव्वा उडवला.

सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सला धड २० ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजानंतर गोलंदाजांनी चोख भूमिका पार पाडली आणि दणदणीत विजय मिळवला.

पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठ्या फरकाने मात करत आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवट विजयाने केला आहे. हैदराबादने केकेआरचा ११० धावांनी दारुण पराभव केला.  हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी २७९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना १८.४ ओव्हरमध्ये १६८ धावांवरच गुंडाळलं.  हैदराबादने यासह आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला.

हैदराबादच्या फलंदाजांची तूफान फटकेबाजी


सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. अभिषेक १६ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. पण, त्याच्यानंतर हेनरिक क्लासेनने केकेआर संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेडने ४० चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.   तर क्लासेनने १०९ धावांच्या खेळीत एकूण ७  चौकार आणि ९ षटकार मारले. असे करत क्लासेन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. हा उजव्या हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिला. याव्यतिरिक्त इशान किशनने २९ धावांचे योगदान दिले.

कोलकाताचे फलंदाज ठरले फेल 


279 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सुनील नारायण, मनीष पांडे आणि हर्षित राणा या तिघांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. सुनील नारायण याने ३१, हर्षित राणा याने ३४ तर मनीष पांडे याने सर्वाधिक आणि ३७ धावा केल्या. दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले अर्थात भोपळाही फोडू शकले नाहीत. सनरायजर्स हैदराबादच्या जयदेव उनाडकट, एशान मलिंगा आणि हर्ष दुबे या त्रिकुटाने केकेआरचं पॅकअप केलं. या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
Comments
Add Comment

Nashik unauthorized encroachment : सारडा सर्कलनंतर आता भद्रकाली, दूध बाजार आणि फाळके रोड परिसर प्रशासनाच्या रडारवर

Nashik unauthorized encroachment : नाशिक शहरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली

Nashik : 'शालार्थ आयडी घोटाळा' हा सुनियोजित कट - सत्र न्यायालय; उपासनीच्या जामिनावर उद्या सुनावणी

Nashik : नाशिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण राज्यात गाजत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) या

Pune Crime : हॉटेलच्या बंद खोल्यांत चालले होत 'ते' कांड, पुणे पोलिसांची छापा पडताच खळबळ

पुणे : पुणे (Pune) शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTC) शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात मोठी कारवाई करत दोन

Ahilyanagar Crime : 'मी माझ्या GFला मारून टाकलं'... एका फोन कॉलने उघडकीस आला थरारक गुन्हा

अहिल्यानगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Bandra Fire : वांद्रे येथील 'अटलांटिक' इमारतीला भीषण आग; ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू

भीषण घटनेत दोन अग्निशमन जवान जखमी मुंबई : वांद्रे (पश्चिम) (Bandra West) येथील शेर्ली राजन रोडवरील 'अटलांटिक' (Atlantic Building) या