दक्षिण मुंबईला मिळणार आता हेरिटेज लूक

स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथासह होणार विकास


मुंबई :दक्षिण मुंबईत आल्यानंतर पूर्वीची मुंबई अनुभवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नरिमन पॉईंट, फोर्ट, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, ग्रँट रोड, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल परिसर, काळा घोडा व अन्य आजूबाजूच्या परिसराला हेरिटेज लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने कामे सुरू झाली असून येथील इमारतींना साजेसे असे पदपथ बांधले जात असून स्ट्रीट लाईट उभारल्या जात आहेत.


दक्षिण मुंबईतील मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व परिसरातील इमारती ब्रिटिशकालीन आहेत. अनेक इमारती १०० ते १५० वर्षे जुन्या असून आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. पण गेल्या ५० वर्षांत दक्षिण मुंबई व आजूबाजूच्या परिसराचा विकास करताना, पदपथाचे जुने दगड काढून टाकण्यात आले. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बदलण्यात आल्या. रस्ते, दुभाजक यांनीही पूर्वीचे वैभव हरवून बसले. यात मलाड दगडाचा वापर करून पुन्हा पदपथ बांधण्यासह पदपथावर दगडी लाह्या, वाहतूक बेटांचा विकास, हेरिटेज स्ट्रीट लाईट, इमारतींना साजेसे असे रंगकाम व अन्य कामे करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी सीएसएमटी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून चर्चगेट ते चेन्नई रोड जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडलगत पदपथ व हेरिटेज लूक देणाऱ्या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या.



याच पद्धतीने दक्षिण मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हेरिटेज लूक असणाऱ्या स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ तयार करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई शहर व उपनगरातील जुने लोखंडी बस स्टॉप व लोखंडी बसथांबे यांचेही लूक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १०० बस स्टॉप नावीन्यपूर्ण पद्धतीने बदलण्यात येणार आहेत. ही कामे मुंबई महापालिकासह जिल्हा नियोजन समिती निधीतून करण्यात येणार आहेत.

दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. यात हेरिटेज स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ, एकसमान स्टॉल व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी या कामाचा शुभारंभ होईल, असे सांगण्यात
येत आहे.


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात

शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या

वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद