Pune Rain: जेजुरीच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप, पुण्यात पावसाची भुरभुर कायम

  61

पुणे:  राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात देखील पावसाची भुरभुर कायम आहे. दरम्यान, जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जेजूरी गडाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,


आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.  अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानच्या (Jejuri Khandoba Temple) जेजूरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी धो धो वाहू लागले. यामुळे भाविकांची तसेच जेजूरी गडावर असलेल्या हार विक्रेत्यांची प्रचंड धावपळ झाली.



जेजूरीच्या नऊ लाख पायऱ्यांवर मूसळधार


जेजुरी जवळच्या नाझरे धरणात काल आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप आलं होतं. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला.  या  पावसाचा वेग हा इतका प्रचंड होता की, जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.





अनेकांच्या घरात पाणी शिरले


सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे तुडुंब भरले, ज्यामुळे अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.


Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’