Mumbai Gutter : मान्सून दारी, झाली असेल का मुंबईची नालेसफाई ?

पावसाळा, मुंबई आणि मुंबईकरांची दैना...हे एक नातं तयार झालंय. नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते. मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूया या लेखातून...



मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीय. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय. मुंबईत एकूण २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे.



नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत ६४ टक्के नालेसफाई झाली होती. यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलीय. अनेक नाल्यामधून गाळ काढण्यात आलाय. त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा पावसाळा मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण