महाराष्ट्राला पावसाचा दणका, लोकल १० ते २० मिनिटे उशिराने

मुंबई : यंदा मान्सूनचं देशात लवकर आगमन झालंय. महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू आहे. पावसाच्या दमदार आगमन झाल्याची वर्दी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेनेही दिली आहे. लोकल दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. राज्यात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पहाटेपासून पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावर गाड्या दहा ते वीस मिनिटे विलंबाने धावत आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत, खोपोली, बदलापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहे.तसेच मुंबईहून कल्याण, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत आहेत. मुंबईच्या आसापसच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढताच वीज खंडीत केली जात आहे. काही ठिकाणी वारे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत आहेत. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम