वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रीटमेंट, जामिनावर सुटलेल्या बडतर्फ रणजित कासलेचा दावा

बीड : मस्साजोगचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, असा आरोप जामिनावर सुटलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने केला आहे. न्यायालयीन कोठडीत असताना स्वतःच्या डोळ्यांनी वाल्मिक कराडला मिळत असलेली विशेष वागणूक बघितली; असे रणजित कासलेने सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याने ही माहिती सार्वजनिक केली आहे.

वाल्मिक कराडला दररोज तुरुंगामध्ये पोटभर जेवण दिले जाते. चांगल्या कपात गरम चहा मिळतो. जेवणाव्यतिरिक्त एरवी खाण्यापिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण, चिवडे मिळतात. जेवणासाठी त्याला तेल लावलेल्या गरमागरम मऊ लुसलुशीत पोळ्या मिळतात. दर बुधवारी आणि रविवारी पोटभर चिकन दिले जाते. हे सगळे स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याचे जामिनावर सुटलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने सांगितले. तुरुंग प्रशासनाने काही दिवसांतच मला दुसऱ्या कोठडीत ठेवले. मला वाल्मिकच्या हालचाली लगेच कळू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. एवढे करुनही मी वाल्मिकला मिळणाऱ्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त करतोय हे लक्षात आल्यावर मला जामीन मिळावा यासाठी हालचाली झाल्या, असा दावा रणजित कासलेने केला आहे.

कासलेवर अॅट्रॉसिटी, फसवणूक तसेच निवडणूक काळातील दोन गुन्हे अशा एकूण चार गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमुळेच त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. नुकताच तो जामीन मिळाल्यामुळे तुरुंगाबाहेर आला आहे. बाहेर आल्यावर सोशल मीडिया पोस्ट करुन रणजित कासले नव्याने चर्चेत आला आहे.
Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ ह्युंडाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरु असलेल्या चौकशीत

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या