राजेंद्र हगवणेचा लॉकर सील, नीलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : वैष्णवी हगवणेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पैशांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील कलमात वाढ करीत नीलेश चव्हाणलाही आरोपी करण्यात आले आहे. तसेच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील करण्यात आले आहेत.

वैष्णवीला लग्नात देण्यात आलेले ५१ तोळे सोन्याचे दागिने हगवणे कुटुंबाने बँकेकडे गहाण ठेवले आहेत. सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. याबाबत बँकेशी पत्रव्यवहार केला असून, गहाण ठेवलेले सोने हे हुंड्यातील असल्याचे कळविले आहे. हगवणे पिता-पुत्रांनी पसार असताना वापरलेल्या दोन लक्झरी कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीय गेले असता नीलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवला होता. या कृतीद्वारे त्याने बाळाच्या जीवाला धोका निर्माण केला म्हणून नीलेश विरोधात पोलिसांनी ‘मुलांची काळजी व संरक्षण’ या कलमाची वाढ करत गुन्हा नोंदवला आहे. नीलेशला पोलीस शोधत आहेत. याआधी वारजे पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये नीलेश विरोधात महिलेचे छुप्या कॅमेऱ्याने शूटिंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.