Monsoon Update: केरळ, तामिळनाडू, कर्नाटकला मान्सूनचा रेड अलर्ट, गोवा-महाराष्ट्रातही अलर्ट

  121

मुंबई:  मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाल्याने राज्यासह देशासाठी सुखावणारी आणि दिलासादायक बातमी आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज (25 मे) तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका


मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तब्बल 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढील दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचे बघायला मिळत आहेत. आज रविवारी, मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पावसाचे आगमन झाले आहे.

Comments
Add Comment

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा

अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना,

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा