किसान सभेचा दिंडोरीत मोर्चा

तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी; वाहतुकीची काही काळ कोंडी


दिंडोरी : अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, डी.वाय.एफ.आय तालुका अध्यक्ष आप्पा वाटणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देविदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील येथे मोर्चा काढण्यात आला. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चास प्रारंभ करत थेट तहसील कार्यालयात मोर्चा येताच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते, पो. नि. रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


काही काळ चक्का जाम : दिंडोरी पंचायत समितीच्या समोर मोर्चाच्या सुरुवातीस निळवंडीरोड वर वाहनाचा काही काळ चक्का जाम झाला होता. यावेळी शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा असा हुंकार मोर्चा वेळी देण्यात येत होती, नाशिक - कळवण रास्त्यावर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


किसान सभेच्या मागण्या :




  • वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा.

  • तालुक्यातील सर्व एमआयडीसी व कारखान्यातील रोजगारात स्थानिक युवक, युवतींना ८०% प्राधान्य द्यावे.

  • ऑनलाईन रेशन कार्ड करून लाभार्थ्यांना शिधा वाटप करा,

  • वृद्धापकाळ, विधवा महिला पेन्शन चालू करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा.

  • जनसुरक्षा विधेयक मागे घ्या.

  • हेग्जोगोन न्यूट्रिशियन कंपनीच्या कामगारांना पूर्वत कामावर घ्या,

  • सफाई कामगारांना किमान वेतन लागू करा.

Comments
Add Comment

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी नाशिक : मराठा

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील