जपानला मागे टाकत भारत झाला जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था

  88

नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. भारत वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली. भारताची अर्थव्यवस्था आता चार ट्रिलियन डॉलरची अर्थात चार हजार अब्ज डॉलर म्हणजेच ३४० लाख कोटी रुपयांची झाली आहे.

जगावर मंदीचे सावट आहे. अनेक देशांचे संघर्ष सुरू आहेत. या संघर्षांचा अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर परस्पर आयात शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहे. काही मुद्यांवर चीन आणि युरोपियन महासंघ विरुद्ध अमेरिका असे टॅरिफ वॉर सुरू आहे. या प्रतिकूल वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. भारताने झपाट्याने प्रगती करत जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थात आयएमएफच्या माहितीचा संदर्भ देत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले. भारताने जपानला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाची गती कायम राहिली अथवा वाढली तर पुढील दोन ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.

याआधी शनिवार २४ मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची