ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या केवळ वावड्या! 'दोनदा फसवले', संदीप देशपांडेंचा उद्धव सेनेवर थेट हल्ला!

  63

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. “ठाकरे गटाने आम्हाला दोन वेळा फसवले आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी युतीच्या शक्यतेवर पाणी फेरले आहे.



काय म्हणाले संदीप देशपांडे?


देशपांडे म्हणाले, “२०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकांपूर्वी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना पाठवलं होतं. पण चर्चाच सुरू ठेवत त्यांनी आमचा विश्वासघात केला.”


ते पुढे म्हणाले, “सध्या उबाठा गटासोबत आमचा कोणताही संवाद नाही. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन ‘सकारात्मक आहोत’ म्हणतात, पण युती करायची असेल तर प्रत्यक्ष पुढे यावं लागेल. आम्ही फक्त चर्चा नाही, कृती केली होती.”



राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर संशय


राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर संदीप देशपांडे म्हणाले, “त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय बोललं आणि काय अर्थ निघाला, यावरच आमच्यात संभ्रम आहे.”


दरम्यान, संजय राऊत यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत आणि मराठी माणसासाठी सर्व भेद विसरायला हवे. मात्र मनसेकडून आता आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही शक्यता अजूनही अंधारातच आहे.


सद्यस्थितीत ठाकरे सेना आणि मनसे युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित आहे. संदीप देशपांडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला

जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून

चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात

Monsoon: ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून

लवकरच एसटीचे रिटेल इंधन विक्रीत पदार्पण : प्रताप सरनाईक

मुंबई : उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारी तुन एसटी

७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, शाहरुख खान-विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची