आला रे मान्सून आला, राज्यात कधी बरसणार ?

नवी दिल्ली : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. यंदा मे महिन्यात मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये लवकर आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस लवकर येण्याची शक्यता आहे. मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू राहिला तर राज्यात आठवड्याभरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.



मागील दोन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शहरी भागांमध्ये उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. पण शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मान्सून आता केरळात दाखल झालाय. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहेत याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.

केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हमावान खात्याने वर्तवलाय. आता पुढील साधारण ७ ते ८ दिवसांत म्हणजेच ६ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या भागांत प्रथम पाऊस पडेल. यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा प्रवास पाहता कोकणानंतर तो दहा जूनपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा तर शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूला सुरुवात झालीय. त्यामुळे पावसातून जाताना दप्तर भिजणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.
Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील