शिर्डीतून चोरी झालेले अडीच कोटीचे दागिने जप्त

  467

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


शिर्डी : शिर्डी येथून सराफ व्यापा-याचे चोरी झालेले २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रुपयांचे २ किलो ६८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले आहेत. मात्र आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी, वय ३५, धंदा सोने व्यापारी, रा. आवाल घुमटी, ता. अमिरगढ, जि. बनासकाटा, गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले. दि. १३ मे २०२५ रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हर ३ कोटी २६ लाख रूपये किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला.


याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हयाचा तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुषंगाने पो. नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.



तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा पुणे, मुंबई येथे शोध घेतला. परंतु आरोपी हा त्याचे मुळ गावी इब्रे का ताला, ता. चोहटन, जि.बारमेर, राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित रा. चौहटन, जि. बारमरे, राजस्थान (फरार) याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.


पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगुन आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविणेबाबत सांगीतले. दि. २३ मे रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित, वय ३३, रा. इब्रे का ताला, ता. चोहटन, जि. बारमेर, राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असले बाबत कळविले. पथकाने पंचासमक्ष त्याचेकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने दि. २१ मे रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधुन आणुन घरी ठेवले व तो कोठेतरी निघुन गेल्याची माहिती दिली.


पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रूपये किंमतल्या २ किलो ६८७.३६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने (एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसुत्र वाट्या, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग) असा मुद्देमाल जप्त केला.


गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल