Corona Update : कोरोनाची पुन्हा एन्ट्री! मुंबई, दिल्लीसह देशात रुग्णसंख्येत वाढ; रुग्णालयांना अलर्ट जारी!

नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा भारतात शहरी भागांमध्ये डोके वर काढत आहे. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनांनी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.



देशभरातील वाढती कोरोना आकडेवारी:




  • दिल्ली: २३ नवीन रुग्ण; तीन वर्षांतील ही पहिली मोठी नोंद. दिल्ली सरकारने बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, टेस्ट किट्स आणि लस स्टॉक सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.




  • मुंबई: मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्ण; यातील फक्त १६ रुग्ण रुग्णालयात दाखल. लक्षणे असणाऱ्यांना टेस्ट करण्याचे आवाहन.




  • ठाणे: तीन दिवसांत १० रुग्ण सापडले.




  • केरळ: मे महिन्यात २७२ रुग्णांची नोंद – देशातील सर्वाधिक. मास्क बंधनकारक; रुग्णालये अलर्ट मोडवर.




  • कर्नाटक: ३५ नवीन रुग्ण; एका ९ महिन्यांच्या बाळालाही लागण.




  • नोएडा-गाझियाबाद: नव्याने रुग्ण आढळले.




ही वाढ JN.1 ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा प्रकार सध्या जास्त गंभीर नसला, तरी लक्षणे सौम्य असून ताप, गळा खवखवणे, नाक वाहणे, थकवा, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे दिसत आहेत.



सतर्क राहा, पण घाबरू नका, असा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. प्रशासनांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवला असून, इन्फ्लुएंझा आणि सिव्हियर रेस्पिरेटरी इन्फेक्शनची माहिती दररोज अपलोड करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


सूचना: लक्षणं आढळल्यास त्वरित टेस्ट करून घ्या, मास्क वापरा आणि गर्दी टाळा.

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड