Chhagan Bhujbal: नव्याने मंत्री झालेले भुजबळ राजीनामा देण्यास तयार

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी आज एक मोठं वक्तव्य केलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन  भुजबळांची वर्णी लागली चर्चा आहे.  त्यामुळे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असे छगन भुजबळ म्हणाले.


महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलूनही दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तब्बल पाच महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, ज्यामुळे भुजबळांना संधी देण्यात आली अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना मोठे वक्तव्य केलं आहे.



धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईल: भुजबळ


भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न भुजबळ यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन." असे वक्तव्य केलं आहे.


मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार असे देखील ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत

उबाठाच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड

श्रद्धा जाधव यांची क्षमता, तरी दाखवला अविश्वास मुंबई : मुंबई महापालिकेत उबाठाच्या नेतेपदी माजी महापौर किशोरी

शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी लांबणीवर

‘तारीख पे तारीख’ सुरूच नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

मुंबईत उबाठाचा पहिला नगरसेवक फुटला

सरिता म्हस्के शिवसेनेच्या संपर्कात; कल्याण-डोंबिवलीत ११ पैकी ४ नगरसेवक फुटले मुंबई : कल्याण डोंबिवली