अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बम

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले यांनी सर्व गाण्यांना संगीताची जोड दिली आहे. अल्बममधील पहिले गाणे ‘सोप्पं नव्हं माय’, नुकतेच प्रदर्शित झाले असून याचे गीतलेखन वैभव जोशी यांनी केले आहे. यात लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब झळकत असून, एक हळवं आणि संवेदनशील दृश्यरूप यात पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला या अल्बममधील एक गाणे प्रदर्शित होणार असून समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. या अल्बमच्या पार्श्वभूमीवर ‘आई’ या संकल्पनेवर आधारित एक विशेष पॉडकास्ट सादर करण्यात आले. या पॉडकास्टमध्ये ‘आई’ या नात्याचा भावनिक वेध घेत कलाकार मंडळींनी आपल्या अनुभवांची मनमोकळी चर्चाही केली.

या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आई या नात्याला शब्दांत पकडणं शक्य नाही, परंतु गाण्यातून त्या भावना पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. ही केवळ गाणी नाहीत, तर प्रत्येकाची एक व्यक्तिशः भावना आहे, आईसाठी. ‘आई’ या नात्याच्या असंख्य पदरांना स्पर्श करणारा हा अल्बम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी आशा आहे.’’
Comments
Add Comment

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची

मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे