Beed Firing News: गोळीबाराच्या घटनेनं बीड पुन्हा हादरलं, एक ठार, नेमकं काय घडलं?

  139

बीड: गेल्या काही महिन्यांपासून पवनचक्की प्रकल्प वादग्रस्त ठरले आहेत. खंडणी, फसवणूक, वाद-विवाद आणि गुन्हेगारीमुळे या प्रकल्पांकडे वारंवार लक्ष वेधले जात आहे.  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्की प्रकल्पावर, चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याने एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, अन्य चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.


प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी प्रकल्पस्थळी चोरीच्या उद्देशाने घुसखोरी केली होती. सदर ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात येताच, चोरट्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षकाने त्यांवर गोळीबार केला. दरम्यान एका चोरट्याला गोळी लागून तो जागीच ठार झालं, तर त्याचे अन्य साथीदार फरार होण्यास यशस्वी झाले.



पोलिसांकडून सध्य प्रकरणाचा तपास सुरू


या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, पंचनामा करण्यात आला आहे.  चोरी करण्यास आलेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.  दरम्यान, सुरक्षारक्षकाने नेमका गोळीबार का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ