हगवणे कुटुंबाने वैष्णवीचाच नाही तर तिच्या बाळाचाही छळ केला, कस्पटे कुटुंबाचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. हगवणे कुटुंबाने पैशांसाठी वैष्णवीचा छळ केला. या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत जीवन संपवले. आता वैष्णवीच्या बाळाचाही छळ झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळाला आहे. बाळ वैष्णवीच्या माहेरी सुरक्षित आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे. पण वैष्णवीच्या बाळाची म्हणजेच जनकराजेची तब्येत अचानक बिघडली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यावर हगवणे कुटुंबाने जनकराजेचाही छळ केल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला एका व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. बाळाचा ठावठिकाणा कोणालाही लवकर कळू नये यासाठी बाळाला सतत गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपेतच ठेवले जात होते. जेमतेम नऊ महिन्यांच्या बाळाला सतत तीन दिवस गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सततच्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाला आणि बाळाच्या कंबरेजवळ गाठ आली. जनकराजेच्या कमरेला गाठ आल्याचे लक्षात येताच कस्पटे कुटुंबाने बाळाला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीतून बाळावर झालेल्या अत्याचाराचा अंदाज आल्याचे कस्पटे कुटुंबाने सांगितले.
Comments
Add Comment

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व