जिंदाल पॉलीफिल्ममधील आग अखेर आटोक्यात

५६ तासांनंतर प्रशासनाला यश


इगतपुरी:मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर ५६ तासानंतर आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती. जवळपास २५ शहरातील अग्नीशमन दलाचे १०० च्या वर बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. गुरुवार, दि. २२ रोजी कंपनीच्या परिसरातील असलेल्या मुंढेगाव, शेणवड खुर्द, बळवंत नगर, मुकणे, पाडळी आदी गावातील नागरिकांना गाव खाली करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. शुक्रवारी काही प्रमाणात आग आटोक्यात आल्यानंतर व धोका कमी झाल्यानंतर गाव सोडून गेलेले नागरिक हळुहळु पन्हा गावात परतताना दिसुन आले. शुक्रवार दि. २३ रोजी शालेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिंदाल कंपनीत भेट देऊन परिसरात पाहणी केली.


यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, तीन दिवसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम प्रगतीपथावर सुरु होते. आग आटोक्यात आली असली तरी ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे दोन दिवस धुर बघायला मिळेल, आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. दोन वर्षांपूर्वी लागलेली आग आणि आत्ता लागलेल्या आगी मागील नक्की कारण काय, त्याचा तपास केला जाईल. मंत्रालय नोडल अधिकारी, रिलायन्स आणि इतर अनेक विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी येथे उपस्थित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खबरदारी घेण्यात आली होती का ? आग कशामुळे लागली ? तज्ञ शोध घेतील आणि अहवाल करून तपास केला जाईल. टेक्निकल ऑडिट बाबत माहिती घेतली असता ऑडिट केले अशी माहिती कंपनीकडून मिळाली मात्र चौकशीमध्ये सर्व माहिती समोर येईल, कंपनीकडून ऑडिट केले गेले होते का? नेमकी काय चूक होती त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होईल.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. तिन दिवसांपासून धूर बाहेर पडतोय, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतील तर सर्वेक्षण केले जाईल. फायर ऑडिट जर झाले असेल तर ही दुर्घटना का झाली? दोषी कोण? कायद्यात राहून पुढील सर्व
कारवाई होईल.


कंपनीतील मेटालायझर युनिट १, २, ३ आणि पोलिस्टर लाईन ए, बी, सी, डी पूर्णपणे जळून खाक झाले असून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रॉफेन गॅस टाकीपासून आगीला लांब ठेवणे गरजेचं होतं त्यात यश आले आहे. आग प्रोफेन टॅंक पासून ५० मीटर अंतरावर आहे. बॉयलर आणि प्रोफाईल टँकवर पहिल्या दिवसापासून कुलिंग प्रक्रिया सुरू केली होती.


कच्चा माल जास्त असल्याने आग वाढली होती त्यामुळे आम्हीं १२ डंपर ४ जेसीबी लावून तो माल बाजूला केला टेक्निकल टीमने व्हेरिफाय केले आहे की टँकचा स्फोट झालाच तर त्याची तीव्रता पाचशे ते सातशे मीटर पर्यंत जाणवेल. मात्र काल रात्रीच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यश आले असुन आता परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, अशी माहिती उपविभागीय अधिकारी ओंकार पवार यांनी दिली.


अग्नीशमनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या टिम येथे आल्या होत्या यात नाशिक, एमआयडीसीची टीम होती, आगीचे स्वरूप बघता विविध महापालिकांच्या जसे ठाणे, पिंपरी-चिंचवड, खाजगी कंपन्या जसे रिलायन्सच्या गाड्या आल्या, तसेच एनडीआरएफची टीमही येथे आलेली, सर्वांनी आगीवर नियंत्रण ठेवले, काळजी घेतली यापुढे आग वाढणार नाही.


धुरामध्ये एक्सेस मिळवत शीटवर पाणी मारणे, सुरवातीला धूर होता , पण संधी मिळताच आतमध्ये जाऊन नियंत्रण केले. अशा कंपन्यांनी फायर ऑडिट केले पाहिजे, त्यांनी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी यांच्याकडून इंडस्ट्रियल सेफ्टी ऑडीट केले असेल; पण फायर सेफ्टी ऑडिट पण केले पाहिजे. इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट पण करायला हवे, त्यात त्यांचे अभियंते पण असतात, अशी माहिती महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे सहायक संचालक किरण हत्याल यांनी दिली.

Comments
Add Comment

Nashik Earthquake News : नाशिकच्या 'या' तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik Earthquake News : नाशिकमधील सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांमध्ये गुरुवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने

Nashik : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर, भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

Nashik : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण करा; कुंभमेळा प्राधिकरणाचे विभागांना निर्देश

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या औपचारिक

Nashik News : सिडकोतील अतिक्रमणांवर मनपाचा बुलडोझर, अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या

Nashik News : सिडको येथील स्टेट बँक चौपाटीलगत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेच्या

Railway Alarm chain pulling : रेल्वेतील 'अलार्म चेन'चा गैरवापर टाळा, भुसावळ विभागाचे प्रवाशांना आवाहन

Railway Alarm chain pulling : रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये दिलेली 'अलार्म चेन पुलिंग' (ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन

Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन , 'गुंगी गुडिया'वरून राजकारण तापलं

Nashik News : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार