अ‍ॅपच्या ड्रायव्हरने भाडे नाकारल्यास १०० रूपयांचा दंड

राज्य शासनाकडून वाहतुकीसाठी धोरण जाहीर


मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने अ‍ॅप आधारित वाहतूक सेवेसाठी एकत्रित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विनाकारण भाडे रद्द करणाऱ्या चालकास भाड्याच्या १० टक्के किंवा १०० रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा दंड बुकिंग करणाऱ्या ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच ग्राहकानेही कारण न देता फेरी रद्द केल्यास त्याला ५० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. अनेकदा मोबाइल अॅपवरून कॅब बुक केल्यानंतर जवळचे भाडे असल्यास किंवा अपेक्षित भाडे नसल्यास कॅब ड्रायव्हर बुकिंग रद्द करतात. तसेच प्रवाशांना बुकिंग रद्द करण्यासाठी भाग पडतात. त्यामुळे दंडाच्या स्वरूपात प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा होतात. मात्र, आता नव्या धोरणानुसार प्रवाशांना शेवटच्या क्षणी ड्राइव्हरकडून होणाऱ्या कॅन्सलेशनला आणि बुकिंग रद्द करण्यासाठी अॅपकडून होणाऱ्या दंडाला सामोरे जावे लागणार नाही.



महिला सुरक्षेवर भरov


नवीन धोरणानुसार अपआधारित सेवेसाठी वाहनांचे रिअल टाइम ट्रॅकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन संपर्क सुविधा पुरवणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. महिला प्रवाशांसाठी प्रवासात सर्वोच्च सुरक्षितता राखण्यासाठी सहप्रवासासाठी केवळ महिला चालक किंवा महिला सहप्रवासी निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यासोबतच चालकाच्या चारित्र्याची आणि पार्श्वभूमीची पडताळणी, चालक परवाना नूतनीकरण, प्रसंगी अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण प्राप्त करणे बंधनकारक असणार आहे. चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षण आवश्यक असेल.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नव्या प्रकल्पांमुळे लोकल सेवांना वेग; प्रवाशांना दिलासा मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी येत्या काळात