आरेच्या जंगलात शाही ससाण्याचे दर्शन

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आरेच्या जंगलात काही दिवसांपूर्वी शाही ससाण्याचे दर्शन घडले. यामुळे पक्षीप्रेमी तसेच पर्यावरणतज्ज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय उपखंडात आढळणारा शाही ससाणा हा शिकारी पक्षी असून, आरेच्या जंगलात तो दिसणे ही आश्चर्यकारक बाब आहे.


काही दिवसांपूर्वी वन्यजीव छायाचित्रकार महेश यादव यांनी शाही ससाण्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून, हा ससाणा काही वेळ आरे वसाहतीतील तबेल्याच्या शेडवर बसला होता आणि नंतर त्याने भरारी घेतली.



आरे परिसरातील वन्यप्राणी संवर्धनासाठी ही एक सकारात्मक नोंद ठरते, असे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शाही ससाणा हा जगातील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो. त्याचे मुळ खाद्य लहान पक्षी असते. वाढत्या शहरीकरणाचा त्याच्या अधिवासावर मोठा परिणाम झाला असून, मुंबईसारख्या महानगरात त्याचे दर्शन झाले हे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरते. यापूर्वीही शाही ससाण्याच्या नोंदी झाल्या आहेत.


ही घटना आरे जंगलातील जैवविविधतेचे आणि संरक्षित वनक्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत करते. अशा दुर्मिळ जीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आरेसारख्या हिरवळीच्या क्षेत्राचे संवर्धन आवश्यक आहे, असे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले. शाही ससाणा हा पेरेग्रीन फाल्कन या प्रजातीची एक उपप्रजाती असून तो विशेषतः भारतीय उपखंडात आढळतो. हा पक्षी अत्यंत वेगवान शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या शरीराची लांबी सुमारे ३८ ते ४५ सें.मी. आहे. पंखांची रुंदी ९० ते ११० सें.मी. असून त्याची पाठ काळसर निळसर रंगाची असते.


तसेच छातीवर फिकट तपकिरी आडव्या पट्ट्या असतात. त्याच्या उड्डाणाचा वेग ३०० किमी प्रतीतास किंवा त्यापेक्षा जास्त असतो. त्याचा नैसर्गिक अधिवास डोंगराळ तसेच नदी आणि खाडी परिसरात असतो.


Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची