४ लाखांहून अधिक वाहनधारकांची पाठ!

उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यास निरुत्साही


विरार :एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट वाहनाला बसविण्याकरिता ३० जूनची अंतिम मुदत आहे असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक वाहनधारकांनी अद्याप यासाठी नोंदणीच केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र एप्रिल२०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत.


संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले होते. वाहनधारकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आता ३० जूनपर्यंत नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतः देखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे.



वाहने ४ लाख ७८ हजार; प्लेट नोंदणी ७० हजार


पालघर जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने आहेत. त्यापैकी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केले होते.


त्यानंतर दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आता १९ मे पर्यंत ७० हजार ७८८ वाहनधारकांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ४ लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही.


परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.




एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे.भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करावी. आणि वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर.


Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच