Chhagan Bhujbal: ढोल ताशाच्या गजरात छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

"हा हां मैं देर से आया हुं, दुरुस्त आया हुं", मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी नाशिककरांसमोर व्यक्त केल्या भावना


नाशिक:  कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यादरम्यान आज त्यांचा नाशिक येथील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे  जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जनतेच्या प्रेमामुळे आपण विविध वेळा मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळी आपण पहिले प्रदेशाध्यक्ष होतो. या पक्षाच्या बांधणीसाठी आपण आपण महत्वाचे काम केले आहे. मात्र गेल्या काळात बाजूला राहिल्याने थोड दुःख आपल्याला नक्कीच झालं होते. मात्र त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पुन्हा आपल्या मंत्री पदाची शपथ घेण्याचे कळविले. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण मंत्रिमंडळात असावे याबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे आपण मंत्री पदाची शपथ घेतली असल्याचे सांगत "हा हां मैं देर से आया हुं, दुरुस्त आया हुं" अशा पंक्तीतून आपल्या भावना व्यक्त केल्या.



'नाशिकचा मी बालक': छगन भुजबळ


कार्यकर्त्यांनी आणि नाशिककरांनी केलेल्या सत्कारानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान मुंबई, पुणे प्रमाणे नाशिकला देखील पुढे आणण्याचा आपला प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नाशिकचा विकास वर्षानूवर्ष होत असून, विविध उद्योगधंदे आणि आर्थिक सुबत्तेबरोबरच नाशिक पर्यावरणपूरक ठेवण्याचा देखील प्रयत्न असेल असे आश्वासन त्यांनी दिले. यादरम्यान गोदावरीचे पाणी प्रदूषणमुक्त ठेवण्यावर देखील त्यांनी विशेष भर दिला.

Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच