Riteish Deshmukh : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार! या दिवशी येणार रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट

  77

मुंबई : रितेश देशमुखने २०२४ मध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचे सेटवर शूटिंग करतानाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळेच प्रेक्षक देखील या सिनेमाबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आतुर होते.


अखेर अभिनेत्याने स्वत: रिलीज डेटची घोषणा करून ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावंही उघड केली आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मे २०२६ रोजी ( महाराष्ट्र दिन ) हा सिनेमा एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल.


रितेश देशमुखने नुकतंच या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. अभिनेता लिहितो, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत…राजा शिवाजी!” हा ऐतिहासिक चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. सिनेमाची पहिली झलक पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.



रितेश देशमुखने या पोस्टसह सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावंही जाहीर केली आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख देखील या सिनेमात झळकणार आहे.


दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख स्वत: करणार असून, याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहेत. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.




Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'